शेंद्रा–बिडकीन–वाळूज ग्रीन फील्ड महामार्ग प्रकल्पासंदर्भात बैठक
छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीतआज सार्वजनिक बांधकाम भवन, छत्रपती संभाजीनगर येथे शेंद्रा–बिडकीन–वाळूज ग्रीन फील्ड महामार्ग प्रकल्पासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पार पडली. या प्रकल्पा
अ


छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।आमदार विलास भुमरे यांच्या उपस्थितीतआज सार्वजनिक बांधकाम भवन, छत्रपती संभाजीनगर येथे शेंद्रा–बिडकीन–वाळूज ग्रीन फील्ड महामार्ग प्रकल्पासंदर्भात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक पार पडली.

या प्रकल्पाअंतर्गत भूसंपादन होणाऱ्या शेतकऱ्यांच्या समस्या, शंका व मागण्या जाणून घेत त्यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. विकासाला चालना देणारा हा महत्त्वाचा प्रकल्प वेळेत पूर्ण होणे आवश्यक असले, तरी शेतकऱ्यांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात यावे, याबाबत स्पष्ट सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या.भूसंपादन प्रक्रियेत कोणत्याही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही, प्रत्येकाला योग्य मोबदला व न्याय मिळेल, याची दक्षता घेऊन पारदर्शक पद्धतीने काम करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande