भोकरदन : मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ते योजनेच्या कामांचा आढावा
दर्जेदार आणि वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.) : मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ते योजना अंतर्गत भोकरदन विधानसभा क्षेत्रीय समितीची आढावा बैठक तहसील कार्यालय, भोकरदन येथे आमदार संतोष दानवे यांच्या अध्यक्षतेख
अ


दर्जेदार आणि वेळेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश

छत्रपती

संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.) : मुख्यमंत्री बळीराजा शेत/पानंद रस्ते योजना अंतर्गत भोकरदन विधानसभा क्षेत्रीय समितीची आढावा बैठक तहसील कार्यालय, भोकरदन येथे आमदार संतोष दानवे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीत पानंद रस्त्यांच्या प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना निर्धारित वेळेत आणि दर्जेदारपणे कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

यावेळी आमदार संतोष दानवे यांनी ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी पानंद रस्त्यांची कामे प्राधान्याने पूर्ण करणे आवश्यक असल्याचे सांगितले. शेतकऱ्यांना शेतीमालाची वाहतूक सुलभ व्हावी आणि ग्रामीण विकासाला चालना मिळावी, यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले.

बैठकीत विविध प्रलंबित कामांबाबत संबंधित विभागांकडून माहिती घेण्यात आली. तसेच कामांच्या अंमलबजावणीत कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये आणि गुणवत्तेशी तडजोड न करता कामे पूर्ण करण्यात यावीत, असे निर्देशही देण्यात आले.

या बैठकीस उपविभागीय अधिकारी मनीषा दांडगे, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर, तहसीलदार ज्ञानेश्वर काकडे, कार्यकारी अभियंता दिगंबर कोल्हे, गटविकास अधिकारी श्रीकृष्ण वेणीकर, गटविकास अधिकारी एल. बी. बरगीरे, पानंद रस्ता समितीचे सहअध्यक्ष गणेश ठाले पाटील, सदस्य सांडू पाटील वाघ, सदस्य सुभाष देशमुख, मंडळ अध्यक्ष गणेश इंगळे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande