कोकणातील १० होतकरू विद्यार्थिनींना सायकल वाटप
डोंबिवली, 06 ऑगस्ट (हिं.स.) रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट (मंडल ३१४२) आणि रोटरी क्लब ऑफ खारेपाटण (मंडल ३१७०) यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण व परिसरातील १० होतकरू विद्यार्थिनींना नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले. शाळेत ये-जा
Ph01


डोंबिवली, 06 ऑगस्ट (हिं.स.) रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्ट (मंडल ३१४२) आणि रोटरी क्लब ऑफ खारेपाटण (मंडल ३१७०) यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण व परिसरातील १० होतकरू विद्यार्थिनींना नवीन सायकलींचे वाटप करण्यात आले. शाळेत ये-जा करण्यासाठी दररोज ७ ते ८ किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनींना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला.

रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे अध्यक्ष रो. अतुल गोखले यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. कोकणातील विद्यार्थ्यांसाठी भरीव सामाजिक योगदान देण्याच्या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे संस्थापक अध्यक्ष रो. दयानंद कोकाटे आणि सचिव रो. अजय गुरसाळे यांच्या सहकार्याने या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. सायकली लुधियाना येथून मागवून त्यांची कणकवली येथे जोडणी करण्यात आली.

३ ऑगस्ट २०२६ रोजी शेठ नवीनचंद्र मफतलाल विद्यालयात आयोजित कार्यक्रमात विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. यावेळी रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे ज्येष्ठ सदस्य रो. श्रीपाद कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त, सामाजिक जबाबदारी आणि कर्तव्यदक्षतेबाबत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद हा उपक्रमाचे खरे यश असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाला रोटरी क्लब ऑफ खारेपाटणचे अध्यक्ष रो. मंगेश ब्रह्मदंडे, मानद सचिव रो. सुबोध देसाई, खजिनदार रो. शर्मिन काझी, उपक्रम प्रमुख रो. दयानंद कोकाटे, मुख्याध्यापक संजय सानपसर, पर्यवेक्षक संतोष राऊत, रो. प्रियेशा अमृते, रो. लक्ष्मीकांत हरयाण, रोटरी क्लब ऑफ डोंबिवली वेस्टचे मानद सचिव रो. दत्ता कडुलकर, माजी अध्यक्ष रो. श्रीपाद कुलकर्णी, जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, विद्यार्थिनींचे पालक व ग्रामस्थ उपस्थित होते.

-----------------

हिंदुस्थान समाचार / Prashant Joshi


 rajesh pande