
जळगाव, 06 ऑगस्ट (हिं.स.) जिल्ह्यातील युवक-युवतींना स्वयंरोजगार व उद्योजकतेकडे प्रोत्साहीत करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाची स्वायत्त संस्था असलेल्या जिल्हा अमृत संस्थेंमार्फत “अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम” (EDP) प्रशिक्षण बॅचचे आयोजन जिल्ह्यातील भडगाव येथे 6 ते 18 ऑगस्ट 2026 दरम्यान पर्यंत करण्यात आले आहे. या प्रशिक्षण वर्गाला प्रशिक्षक म्हणून पंकज पाटील (ज.ज.स.बँक लि.जळगाव शाखा भडगाव) बँक व्यवहार संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत.
अमृतचे जिल्हा व्यवस्थापक राजेंद्र कानडे हे अमृतच्या विविध योजना व स्वयंरोजगाराच्या संधींबाबत माहिती देणार असून सहकार्य अमृत मित्र किरण शिंपी करणार आहे. या बॅचमध्ये एकूण 15 प्रशिक्षणार्थी सहभागी होणार असून प्रशिक्षणास ऑनलाईन सुरुवात 11 ऑगस्ट 2026 पासून होणार आहे. प्रशिक्षणामध्ये व्यवसाय नियोजन, डिजिटल व्यवहार, उद्योग व्यवस्थापन, ग्राहक व्यवस्थापन तसेच अमृतपेठ, अमृतपेठ, अमृत पेठ ऑफलाइन, वैयक्तिक व्याज परतावा योजना, ड्रोन पायलट मिशन व विविध कौशल्य विकास योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर