
परभणी, 06 ऑगस्ट, (हिं.स.)। राज्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात येणाऱ्या शासकीय वसतिगृह योजनेअंतर्गत सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता 12 वी नंतर व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांनी शासनाच्या https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर दि. 7 ऑगस्ट 2026 ते दि. 31 ऑगस्ट 2026 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करावेत.
प्राप्त अर्जांची छाननी दि. 1 सप्टेंबर 2026 ते दि. 7 सप्टेंबर 2026 या कालावधीत करण्यात येणार आहे. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी दि. 8 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. या यादीतील विद्यार्थ्यांना दि. 18 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेश घेता येणार आहे.त्यानंतर रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील गुणवत्तेनुसार दुसरी निवड यादी दि. 21 सप्टेंबर 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. दुसऱ्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना दि. 30 सप्टेंबर 2026 पर्यंत प्रवेश घेण्याची अंतिम मुदत राहणार आहे.तरी इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत शासनाच्या https://hmasnew.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरून शासकीय वसतिगृह योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक, रामेश्वर मुंडे यांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis