रत्नागिरी : पराक्रम दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धा
रत्नागिरी, 6 ऑगस्ट (हिं.स.) । छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार, संरक्षण आणि हिंदवी साम्राज्याचा झेंडा उत्तरेपर्यंत दिमाखात फडकविण्याचे अद्वितीय कार्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. त्यांच्या अतुलनीय शौर्य, राष्ट्रनि
रत्नागिरी :  पराक्रम दिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व व रिल्स स्पर्धा


रत्नागिरी, 6 ऑगस्ट (हिं.स.) । छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या स्वराज्याचा विस्तार, संरक्षण आणि हिंदवी साम्राज्याचा झेंडा उत्तरेपर्यंत दिमाखात फडकविण्याचे अद्वितीय कार्य श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी केले. त्यांच्या अतुलनीय शौर्य, राष्ट्रनिष्ठा, युद्धनीती आणि नेतृत्वाचा परिचय नव्या पिढीला व्हावा, या पवित्र उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या अमृत संस्थेतर्फे राज्यस्तरीय निबंध, वक्तृत्व आणि रिल्स स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक स्पर्धेकरिता ५०००, ४००० आणि ३००० रुपयांची अनुक्रमे पहिली तीन बक्षिसे, तर १० उत्तेजनार्थ बक्षिसे तसेच सन्मान चिन्ह दिले जाईल. सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र मिळणार आहे. प्रवेशिका येत्या १५ ऑगस्टपर्यंत सादर करता येतील. नोंदणी व अधिक माहितीसाठी https://parakramdin.mahaamrut.org.in/ या संकेतस्थळाला भेट द्यावी.

सर्व स्पर्धांसाठी विषय असे - १) १८ व्या शतकातील हिंदवी साम्राज्य विस्तारक थोरले बाजीराव पेशवे, २) अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे, ३) थोरल्या बाजीरावांचे संघटन कौशल्य,

४) थोरल्या बाजीरावांची युद्धनीती, ५) थोरल्या बाजीरावांची स्वामीनिष्ठा, ६) थोरल्या बाजीरावांची दिल्ली मोहीम, ७) बुंदेलखंड व छत्रसालाचे रक्षणकर्ते थोरले बाजीराव पेशवे, ८) थोरल्या बाजीरावांचा जगप्रसिद्ध पालखेड विजय

निबंध स्पर्धेची शब्दमर्यादा कमाल १००० शब्द असेल. निबंध मराठी/ हिंदी/ इंग्रजी भाषेत टाइप करून पीडीएफ फाइल स्वतःच्या drive वर अपलोड करावी आणि त्याची लिंक वेबसाइटवर अपलोड करावी. निबंधासाठी लागणारे संदर्भ अमृत पराक्रम दिनाच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंक्स, संदर्भ पुस्तके आणि माहिती पुस्तिकेवरच आधारित असावेत. बक्षीसपात्र निबंधांबाबत परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

वक्तृत्व स्पर्धेकरिता स्पर्धकाने स्वत: बोलत असलेला ७ मिनिटांपर्यंत कालावधीचा व्हिडीओ अपेक्षित आहे. व्हिडीओ सुस्पष्ट, ठळक आवाजात आणि ओरिजनल असावा. कोणत्याही प्रकारचे व्हिज्युअल इफेक्ट्स, साऊंड इफेक्टस, ए. आय जनरेटेड इमेजेस किंवा तत्सम स्वरूपाचे नसावेत. व्हिडीओची गुणवत्ता उत्तम असावी. विडिओ स्वतःच्या drive वर अपलोड करून त्याची लिंक website वर अपलोड करावी. विषयासाठी लागणारे संदर्भ अमृत पराक्रम दिनाच्या वेबसाइटवर दिलेल्या लिंक्स, संदर्भ पुस्तके आणि माहिती पुस्तिकेवरच आधारित असावे. बक्षीसपात्र व्हिडियोचा परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

रील्स स्पर्धेकरिता कोणत्याही एका विषयाला अनुसरून रील्स/शॉर्ट्स बनवणे अपेक्षित आहे. रील्स/शॉर्ट्स २ ते ३ मिनिटांपर्यंत असावी. विषयाला सुयोग्य ठिकाण (लोकेशन) असावे. उत्तम साऊंड क्वालिटी, सुस्पष्ट व्हिडीओ असावा. रील्स स्वत:च्या आवाजात आणि स्वत:वर शूट केलेली असावीत. मूळ विषयाच्या संदर्भानुसार आवश्यक असणाऱ्या इमेज,साऊंड, एआयचा वापर करून मिक्सिंग केले तरी चालेल. रील्स आपल्या स्वताच्या drive वर अपलोड करून त्याची लिंक वेबसाइटवर अपलोड करावी.

निबंध आणि वक्तृत्व स्पर्धा शालेय गट, महाविद्यालयीन गट आणि खुल्या गटात होतील. रील्स स्पर्धा महाविद्यालयीन आणि खुल्या गटात होतील.

अधिक माहितीसाठी संपर्क पत्ता:- विभागीय व जिल्हा कार्यालय अमृत, साळवी स्टॉप, सिंधुदुर्ग हॉटेलसमोर, रत्नागिरी-415612

संपर्क :- 9112228761 / 8087276515 / 8275260285

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande