
छत्रपती संभाजीनगर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। श्री गजानन महाराज संस्थान शेगाव या न्यासाची श्री ची पालखी पायदळवारी पालखी परंपरेनुसार पंढरपुर येथुन परतीच्या मार्गावर असुन या दिंडीमध्ये 700 ते 800 वारकरी सहभागी आहेत. ही पायी दिंडी ही दि. 7 ऑगस्ट 2026 रोजी जालना जिल्ह्यात प्रवेश करणार असुन दि. 9 ऑगस्ट 2026 ते दि. 10 ऑगस्ट 2026 पर्यंत जालना शहरात मुक्कामी राहून दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी जालना – नाव्हा मार्गे सिंदखेड राजा जिल्हा बुलढाणाकडे प्रयाण करणार आहे. ही पायी दिंडी बुलढाणा जिल्ह्यात प्रवेश करतेवेळी जालना –नाव्हा-सिंदखेड राजा महामार्ग क्रमांक 753 सी वर मार्गक्रमण करणार आहे.
दिंडीचे दर्शन घेण्याकरीता मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होणार असुन जड वाहनांच्या रहदारीमुळे क्षुल्लक बाबी वरुन विवादीत परिस्थिती निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पायी दिंडीतील भाविकांच्या व जनतेच्या सुरक्षिततेसाठी व वाहतुकीच्या सुनियमनासाठी या मार्गावरील वाहतुकीस पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक तेघबीर सिंह संधु यांच्या आदेशान्वये राष्ट्रीय महामार्ग क्र. 753 सी वरील जालना –नाव्हा-सिंदखेड राजा रोडवरील येणारी व जाणारी वाहतुक व्यवस्था दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 4.00 ते रात्री 8 वाजेपर्यंत खालील सर्व प्रकारच्या जड वाहतुकीस खाली दिलेल्या पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.
अंबड चौफुली, मंठा चौफुली, कन्हैयानगर बायपास जालना- नाव्हा-सिंदखेड राजा मार्गे सुलतानपुर-मेहकरकडे जाणारी व येणारी जड वाहतुक पर्यायी मार्ग कन्हैयानगर जालना मार्गे देऊळगाव राजा-चिखलीकडे जातील व येतील.
वरील मार्गाच्या जड वाहतुकीसाठी दि. 11 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 4.00 ते रात्री 8 वाजेपर्यंत बदल करण्यात आला आहे. असा आदेश पोलीस अधीक्षक यांनी पारीत केला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis