
पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)। :दौंड तालुक्यात आडसाली ऊस लागवडीला वेग आला असून, आधुनिक शेती पद्धतींचा स्वीकार करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढत आहे. साडेतीन फूट अंतरावरील सरी, आधुनिक पट्टा पद्धती तसेच एआय-आधारित उत्पादन तंत्रज्ञानाचा वापर करून ऊस लागवडीवर भर दिला जात आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, तालुक्यात आतापर्यंत सुमारे ९,८५० हेक्टर क्षेत्रावर ऊस लागवड पूर्ण झाली आहे.
चालू वर्षात आतापर्यंत तालुक्यात सरासरी२०० मिलिमीटर पाऊसझाल्याने ऊस लागवडीची कामे टप्प्याटप्प्याने सुरू आहेत. आषाढी वारीनंतर पंढरपूरहून परतलेल्या शेतकऱ्यांनी शेतीच्या मशागतीला वेग दिला असून, सध्या शिवारात लागवडीची लगबग सुरू आहे.
पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक ऊस उत्पादक तालुका म्हणून दौंडची ओळख आहे. मुळा-मुठा आणि भीमा नद्यांमधील बारमाही पाणी, तसेच खडकवासला धरणाच्या बेबी कालवा आणि नवा मुठा कालव्यातून मिळणाऱ्या पाण्याच्या आवर्तनामुळे तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवड केली जाते. पावसाने उघडीप दिल्याने शेतकरी शेतीच्या कामांमध्ये व्यस्त झाले आहेत.
तालुक्यात आडसाली, पूर्वहंगामी आणि सुरू अशा तीन टप्प्यांत ऊस लागवड केली जाते. सध्या लागवडीसाठी मजुरीचे दर प्रतिएकर सुमारेआठ हजार रुपयेइतके असूनही शेतकरी आडसाली लागवडीला प्राधान्य देत आहेत.
तालुका कृषी अधिकारीअजिंक्य दुधाणेयांनी सांगितले की, दौंड तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये पेरणी आणि ऊस लागवडीसाठी पुरेसा पाऊस झाला आहे. चांगल्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी बीज प्रक्रिया करूनबीबीएफ (BBF)किंवाटोकण पद्धतीनेपेरणी करावी. तसेच ऊस लागवडीसाठीसुपरकेन नर्सरीतंत्रज्ञानाचा अवलंब केल्यास उत्पादन आणि गुणवत्ता वाढण्यास मदत होईल.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु