पुणे, धुळे जिल्ह्यांत जप्त १२ कोटींहून अधिक किमतीचा अमली पदार्थांचा साठा नष्ट
पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)। अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) पुणे आणि धुळे जिल्ह्यांत जप्त केलेल्या अमली पदार्थांची कायदेशीर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावली आहे. एकूण ९ हजार ५३६ किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले असून त्यांची अंदाज
पुणे, धुळे जिल्ह्यांत जप्त १२ कोटींहून अधिक किमतीचा अमली पदार्थांचा साठा नष्ट


पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सने (एएनटीएफ) पुणे आणि धुळे जिल्ह्यांत जप्त केलेल्या अमली पदार्थांची कायदेशीर आणि पर्यावरणपूरक पद्धतीने विल्हेवाट लावली आहे. एकूण ९ हजार ५३६ किलो अमली पदार्थ नष्ट करण्यात आले असून त्यांची अंदाजे किंमत १२ कोटी २९ लाख रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती देण्यात आली.

पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथील एन्व्हायरो पॉवर लिमिटेड कंपनीत जप्त अमली पदार्थांचा निपटारा करण्यात आला. तर धुळे जिल्ह्यात विविध कारवायांदरम्यान मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आलेल्या गांजाचाही याच प्रक्रियेद्वारे नाश करण्यात आला.

पुणे आणि धुळे जिल्ह्यांतील जप्त अमली पदार्थांची विल्हेवाट उच्चस्तरीय ड्रग डिस्पोजल समिती (एचएलडीडीसी) आणि घटकस्तरीय ड्रग डिस्पोजल समिती (आरडीडीसी) यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. संपूर्ण प्रक्रिया कायदेशीर नियमांचे पालन करत पर्यावरणपूरक पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande