सोलापूरात भाजपमधील गटबाजीची चर्चा; इंद्रजीत पवारांच्या सत्कारात सुभाष देशमुखांचे निष्ठावंत कार्यकर्ते
सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। सोलापूर जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत गटबाजीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या सत्कार कार्यक्रमाला माजी मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक म्हणून ओळखले ज
sdfg


सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)।

सोलापूर जिल्ह्यातील भाजपमधील अंतर्गत गटबाजीची चर्चा पुन्हा एकदा रंगली आहे. जिल्हा परिषद उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांच्या सत्कार कार्यक्रमाला माजी मंत्री तथा दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांचे समर्थक म्हणून ओळखले जाणारे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अतुल गायकवाड उपस्थित राहिल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.

जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत इंद्रजीत पवार यांनी शिवरत्न सभागृहाचे नामकरण भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या नावाने करण्याचा ठराव मांडला होता. या निर्णयानंतर सोशल मीडियावर समर्थनाबरोबरच विरोधाच्या प्रतिक्रियाही उमटल्या.

या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी बुधवारी सायंकाळी इंद्रजीत पवार यांचा सत्कार केला. या कार्यक्रमाला अतुल गायकवाड उपस्थित होते. सत्कारादरम्यान त्यांनी इंद्रजीत पवार यांची भेट घेतली आणि छायाचित्रासाठीही उपस्थित राहिले. या कार्यक्रमातील छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजपमधील अंतर्गत राजकीय समीकरणांबाबत चर्चा सुरू झाली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande