सोलापूर महापालिका-एमएसआरडीसीची संयुक्त पाहणी; ड्रेनेज चेंबर्सचा शोध सुरू
सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। होटगी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला स्थगिती दिल्याची घोषणा महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली असली, तरी त्यासंदर्भातील लेखी आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाला न
smc


सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। होटगी रस्त्याच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला स्थगिती दिल्याची घोषणा महापालिका पदाधिकाऱ्यांनी केली असली, तरी त्यासंदर्भातील लेखी आदेश महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला (एमएसआरडीसी) बुधवारी सायंकाळपर्यंत प्राप्त झाला नसल्याने सिमेंट काँक्रिटीकरण वगळता इतर कामे नियमितपणे सुरू ठेवण्यात आली.

होटगी रस्त्यावर पिण्याच्या पाण्याची पाइपलाइन टाकण्याचे काम प्रस्तावित असून, त्या परिसरातील १५ ड्रेनेज चेंबर्स बुजल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे मंगळवारी महापालिका पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी काम थांबविण्याचा तोंडी निर्णय घेतला होता. मात्र, त्याबाबतचे अधिकृत पत्र एमएसआरडीसीला न पाठविल्याने महामंडळाने केवळ काँक्रिटीकरणाचे काम थांबवून इतर कामे सुरू ठेवली.

दरम्यान, बुधवारी महापालिका आणि एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याच्या कामाची संयुक्त पाहणी केली. नव्या रस्त्याखाली असलेल्या ड्रेनेज चेंबर्सचा शोध घेऊन त्यांची स्थिती तपासण्यात आली. बुजलेले चेंबर्स पुन्हा उघडून त्यांना आवश्यक उंचीवर आणण्यासाठी तांत्रिक उपाययोजनांबाबत चर्चा करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande