
सोलापूर, 06 ऑगस्ट (हिं.स.)। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आगामी दौऱ्याच्या नियोजनासाठी वैराग येथे शनिवारी (८ ऑगस्ट) सकाळी १०.३० वाजता सभा आयोजित करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे होणाऱ्या या बैठकीत मराठा समाजाच्या पुढील आंदोलनाची दिशा आणि दौऱ्याचे नियोजन निश्चित करण्यात येणार आहे.
मनोज जरांगे पाटील यांच्या वडाळा येथील इशारा सभेनंतर आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत मराठा समाजाच्या विविध मागण्यांवर चर्चा होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
या सभेला वैराग तसेच परिसरातील सर्व मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सभा यशस्वी करावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड