
पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)।
मोशी येथील कचरा डेपोमध्ये ८ जुलै रोजी झालेल्या दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कायदेशीर वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेने सुरू केली आहे. आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झालेल्या सात मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांच्या बँक खात्यात मदतीची रक्कम थेट जमा करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दिली.
अक्षय सावंत, सन्नी माने, राहुल गायकवाड, वामन कसबे, नागेश गायकवाड, सुनील कोरके आणि रणजीत पाटील यांच्या कायदेशीर वारसांच्या खात्यात प्रत्येकी १० लाख रुपये जमा करण्यात आले आहेत.
दुर्घटनेतील मृत भावेश वाणी आणि महेश कुंभार यांच्या कायदेशीर वारसांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता अद्याप झालेली नसल्याने त्यांच्या खात्यात आर्थिक मदतीची रक्कम जमा करण्यात आलेली नाही. संबंधित कागदपत्रे प्राप्त होताच प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांच्याही वारसांच्या खात्यात नियमानुसार मदतीची रक्कम तातडीने जमा करण्यात येईल, असे डॉ. सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु