पुणे - धायरी ते दांडेकर पूल वाहतूक व्यवस्थेचा नवा आराखडा होणार तयार
पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्त्यावर होत असलेल्या तीव्र वाहतूक कोंडीची महापौर मंजूषा नागपुरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धायरी, नऱ्हे, नांदेड सिटी, वडग
Fly over pool


पुणे, 06 ऑगस्ट (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून सिंहगड रस्त्यावर होत असलेल्या तीव्र वाहतूक कोंडीची महापौर मंजूषा नागपुरे यांनी गंभीर दखल घेतली आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन धायरी, नऱ्हे, नांदेड सिटी, वडगाव ते दांडेकर पूल या संपूर्ण पट्ट्यासाठी पुढील १५ दिवसांत सर्वसमावेशक वाहतूक आराखडा तयार करण्याचे निर्देश दिले. तसेच या परिसरात वाहतूक नियंत्रणासाठी ५० वॉर्डन उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयात झालेल्या बैठकीला सहाय्यक पोलिस आयुक्त वसंत कुंवर, वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल गौड, सुनील गवळी, प्रभाग समिती अध्यक्ष सचिन मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे गटनेते काका चव्हाण तसेच नगरसेवक प्रसन्न जगताप, हरीदास चरवड, सूरज लोखंडे, सुभाष नाणेकर आणि राजाभाऊ लायगुडे यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत नगरसेवकांनी वाहतूक पोलिसांच्या अपुऱ्या उपस्थितीमुळे नियमांचे उल्लंघन, विरुद्ध दिशेने वाहनचालकांची वर्दळ आणि अनधिकृत पार्किंगचे प्रमाण वाढल्याची बाब निदर्शनास आणून दिली. पोलिस वाहतूक सुरळीत करण्याऐवजी दंडात्मक कारवाईवर अधिक भर देत असल्याची टीकाही यावेळी करण्यात आली.

याशिवाय सण-उत्सवांना परवानगी देताना संभाव्य वाहतूक कोंडीचा पुरेसा विचार केला जात नसल्याने परिस्थिती अधिक गंभीर होत असल्याचेही बैठकीत मांडण्यात आले. या प्रश्नांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळासह पोलिस आयुक्तांची भेट घेऊन सविस्तर चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवकांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande