चंद्रपूर : आरोपीला दिले नियमबाह्य 'मेडिकल अनफिट' प्रमाणपत्र; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
चंद्रपूर, 01 सप्टेंबर, (हिं.स.)। येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने नोकरीचे आमिष देवून फसवणूक प्रकरणातील एका आरोपीला मेडीकल कॉलेजच्या डॉक्टरांनी नियमबाह्य पद्धतीने ''मेडिकल अनफिट'' प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून या संपूर्ण
चंद्रपूर : आरोपीला दिले नियमबाह्य 'मेडिकल अनफिट' प्रमाणपत्र; उच्चस्तरीय चौकशीची मागणी


चंद्रपूर, 01 सप्टेंबर, (हिं.स.)। येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने नोकरीचे आमिष देवून फसवणूक प्रकरणातील एका आरोपीला मेडीकल कॉलेजच्या डॉक्टरांनी नियमबाह्य पद्धतीने 'मेडिकल अनफिट' प्रमाणपत्र दिल्याचा प्रकार उघडकीस आला असून या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र व निष्पक्ष उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) चे जिल्हाध्यक्ष मनोज ठेंगणे यांनी पत्रपरिषदेत केली आहे.

चंद्रपूर महानगरपालिका व जीएसटी कार्यालयात नोकरी लावून देण्याचे आमिष देवून जवळपास १००हून अधिक महिलांना लाखो रूपयांनी फसवणूक केल्याप्रकरणात रामनगर पोलीस ठाण्याच्या गुन्हा क्रमांक १०३०/२०२६ अंतर्गत जितेंद्र सारसर हा आरोपी पोलीस कोठडीत होता. छातीत दुखत असल्याच्या कारणावरून २३ ऑगस्ट २०२६ रोजी त्याला शासकीय रुग्णालयात आणण्यात आले होते.दरम्यान आरोपीची पुरेशी शारीरिक तपासणी आणि कागदपत्रांची पडताळणी न करताच, केवळ त्याच्या कथित तोंडी जबाबाच्या आधारे 'मेडिकल अनफिट' प्रमाणपत्र जारी करण्यात आल्याचा आरोप ठेंगणे यांनी केला आहे. या प्रमाणपत्रात आरोपीला मधुमेह, उच्च रक्तचाप आणि दमा असल्याचे नमूद करून उपचारासाठी रुग्णालयात दाखल ठेवण्याची शिफारस करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या प्रमाणपत्रावर आवक-जावक क्रमांक नव्हता, मात्र त्यावर जीएमसीएच चंद्रपूरच्या मेडिसिन विभागाच्या प्राध्यापक तथा विभागप्रमुखांची स्वाक्षरी आणि शिक्का असल्याचे सांगण्यात आले.

जेव्हा या प्रमाणपत्राबाबत मेडीकलचे अधिष्ठाता यांना जा विचारणा करण्यात आली, तेव्हा संबंधित महिला डॉक्टरांना कार्यालयात बोलावण्यात आले. महिला डॉक्टरांनी सदर प्रमाणपत्र आपण लिहिले नसून त्यावर शिक्काही मारला नाही, असे स्पष्ट केले. मात्र त्यावर त्यांचीच स्वाक्षरी असल्याचा दावा केला जात असल्याने कागदपत्रांच्या बनावटपणाचा व प्रशासकीय गोंधळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. याप्रकरणात आरोपीला अनफिट प्रमाणपत्र देण्यासाठी मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप मनोज ठेंगणे यांनी केला. लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) च्या वतीने या प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून प्रमाणपत्र जारी करण्यापासून ते नोंदणीपर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची पारदर्शक पडताळणी करण्याची मागणी करण्यात आली आहे, पत्रपरिषदेत फसगत झालेल्या महिलांची उपस्थिती होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande