लातूर जिल्ह्यात 2 ते 16 सप्टेंबरदरम्यान शस्त्रबंदी व जमावबंदी
लातूर, 1 सप्टेंबर (हिं.स.) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 37 (
शस्त्रबंदी


लातूर, 1 सप्टेंबर (हिं.स.) : कायदा व सुव्यवस्था, सार्वजनिक शांतता आणि सुरक्षितता अबाधित राखण्यासाठी लातूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम, 1951 मधील कलम 37 (1) व (3) अन्वये हा आदेश जारी केला आहे.हा आदेश 2 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12.01 वाजल्यापासून 16 सप्टेंबर 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत संपूर्ण लातूर जिल्ह्यात लागू राहणार आहे.

या कालावधीत तलवार, भाला, बंदूक, सुरा, काठी, लाठी, दंडा किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू सोबत बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे. तसेच दाहक किंवा स्फोटक पदार्थ, दगड अथवा इतर क्षेपणास्त्रे बाळगणे, जमा करणे किंवा तयार करण्यासही बंदी राहणार आहे.याशिवाय पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींनी रस्त्यावर अथवा कोणत्याही एका ठिकाणी एकत्र जमणे, मिरवणूक काढणे तसेच सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण होईल अशा घोषणा, भाषणे, हावभाव, फलक किंवा चित्रांचे प्रदर्शन करण्यास मनाई करण्यात आली आहे.मात्र, अंत्ययात्रा, विवाह समारंभ तसेच कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी-कर्मचारी आणि इतर शासकीय अधिकारी-कर्मचारी यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.

दरम्यान, सभा, धार्मिक मिरवणूक, मोर्चा किंवा उपोषणासाठी परवानगी देण्याचे अधिकार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. मात्र, अशी परवानगी देण्यापूर्वी संबंधित उपविभागीय दंडाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करणे आवश्यक राहणार आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी 2 ते 16 सप्टेंबरदरम्यान लागू असलेल्या या आदेशाची नोंद घेऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande