जळगावात १.२२ कोटींचे एमडी जप्त; स्थानिक पोलिसांना भनकही नाही
जळगाव, 01 सप्टेंबर (हिं.स.) मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या पथकाने जळगावात येऊन तब्बल १ कोटी २२ लाख ७७ हजार ५०० रुपये किमतीचा ४ किलो ९०० ग्रॅम एमडीचा साठा जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, जळगाव शहरात एवढ्या मोठ्या प्रमा
जळगावात १.२२ कोटींचे एमडी जप्त; स्थानिक पोलिसांना भनकही नाही


जळगाव, 01 सप्टेंबर (हिं.स.) मीरा-भाईंदर, वसई-विरार पोलिसांच्या पथकाने जळगावात येऊन तब्बल १ कोटी २२ लाख ७७ हजार ५०० रुपये किमतीचा ४ किलो ९०० ग्रॅम एमडीचा साठा जप्त केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, जळगाव शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणात एमडीचा साठा सापडूनही स्थानिक पोलिसांना याची माहिती नव्हती. या कारवाईमुळे जळगावातील ड्रग्ज तस्करीचे मोठे रॅकेट समोर येण्याची शक्यता आहे.

मीरा-भाईंदर परिसरात एनडीपीएस कायद्यान्वये दाखल असलेल्या गुन्ह्यात काही आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून चौकशीदरम्यान जळगावात तब्बल ५ किलो एमडी ड्रग्जचा साठा पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या मीरा भाईंदर गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रमोद बगळे, उपनिरीक्षक उमेश भागवत यांच्या पथकाने जळगावात पोहोचून कारवाई केली.

पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, त्यांनी सुरुवातीला मेहरूण परिसरातील रामनगरातील रहीम ताहेर पिंजारी (२८) याला ताब्यात घेतले. त्याने उस्मानिया पार्क परिसरातील सय्यद मुशादर अली मुंताज अली (२९) याच्या घरात एमडीचा साठा ठेवल्याची माहिती पोलिसांना दिली.या माहितीच्या आधारे पथकाने कारवाई करत ४ किलो ९०० ग्रॅम एमडी जप्त केले. या अमली पदार्थाची किंमत एक कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात आले आहे. जळगावात सापडलेला एमडीचा साठा इतरत्र विक्री करण्यासाठी आणल्याची माहिती तपासात समोर आली. त्यानंतर पोलिस पथकाने या धाग्याच्या आधारे मध्य प्रदेशात जाऊन कारवाई केली. मध्य प्रदेशातही मोठ्या प्रमाणात एमडीचा साठा असल्याची माहिती पथकाच्या हाती लागल्याचे सांगण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande