खिशातून रोकड लंपास; अवघ्या ५ तासांत चोरटे जेरबंद
जळगाव, 01 सप्टेंबर, (हिं.स.) जळगावच्या शाहूनगर परिसरातील शाहू कॉम्प्लेक्समध्ये एका नागरिकाच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेल्याच्या घटनेचा जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत छडा लावला. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पो
खिशातून रोकड लंपास; अवघ्या ५ तासांत चोरटे जेरबंद


जळगाव, 01 सप्टेंबर, (हिं.स.) जळगावच्या शाहूनगर परिसरातील शाहू कॉम्प्लेक्समध्ये एका नागरिकाच्या खिशातून १२ हजार ५०० रुपयांची रोकड चोरून नेल्याच्या घटनेचा जळगाव शहर पोलिसांनी अवघ्या पाच तासांत छडा लावला. सीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दोन सराईत आरोपींसह एका विधी संघर्षित बालकाला ताब्यात घेतले. आरोपींकडून १२ हजार रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली आहे.

फिर्यादी अनिल राजमल कासट (वय ६२, रा. म्हाडा कॉलनी, जळगाव) हे शाहूनगरमधील शाहू कॉम्प्लेक्स येथे असताना, अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या पॅन्टच्या खिशातील १२,५०० रुपये रोख लांबवले होते. या प्रकरणी जळगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.यांनतर पोलीस पथकाने घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण केले आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयितांची ओळख पटवली. या चोरीत शहीदखान नजीरखान (वय २७, रा. गेंदालाल मिल) आणि समीर खान मजीदखान (वय ३७, रा. गेंदालाल मिल) यांच्यासह एक विधी संघर्षित बालक सहभागी असल्याची माहिती समोर आली.त्यानुसार पोलिसांनी गेंदालाल मिल परिसराबाट तिन्ही संशयितांना ताब्यात घेतले. सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून विधी संघर्षित बालकाला कायदेशीर प्रक्रियेनुसार ताब्यात घेतले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande