
परभणी, 01 सप्टेंबर, (हिं.स.)। परभणी जिल्ह्यात ‘आपले सरकार सेवा केंद्र जाहिरात २०२६’ अंतर्गत सेवा केंद्रांसाठी इच्छुक पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज सादर करण्यासाठी आता केवळ शेवटचे दोन दिवस शिल्लक असल्याने पात्र उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले आहे.
या संदर्भातील सविस्तर जाहिरात www.parbhani.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. गुगल फॉर्मद्वारे ऑनलाइन अर्ज दि.३ सप्टेंबर २०२६ पर्यंत स्वीकारण्यात येत आहेत. आपले सरकार सेवा केंद्राच्या माध्यमातून नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ सुलभपणे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे पात्र व इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत जवळ आली असून, शेवटच्या दिवशी तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेता उमेदवारांनी शक्य तितक्या लवकर अर्ज सादर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातील पात्र व इच्छुक उमेदवारांनी मोठ्या संख्येने अर्ज सादर करून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा सेतू समिती, परभणी यांच्या वतीने करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis