रायगड - शिवाई बसमधून २.६३ लाखांचा ऐवज चोरीला
रायगड, 01 सप्टेंबर (हिं.स.) खोपट ठाणे एस.टी. स्टँड ते अलिबाग आणि पुढे बेलोशी असा प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतून २ लाख ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अ
रायगड - शिवाई बसमधून २.६३ लाखांचा ऐवज चोरीला


रायगड, 01 सप्टेंबर (हिं.स.) खोपट ठाणे एस.टी. स्टँड ते अलिबाग आणि पुढे बेलोशी असा प्रवास करणाऱ्या महिलेच्या बॅगेतून २ लाख ६३ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला फिर्यादी आणि त्यांचे पती यांनी खोपट ठाणे येथून अलिबाग रायगडच्या दिशेने शिवाई बसने प्रवास केला. त्यानंतर ते अलिबागहून त्यांच्या मूळ गावी बेलोशी येथे गेले. बेलोशी येथे पोहोचल्यानंतर फिर्यादी यांनी आपली बॅग तपासली असता त्यांना बॅगेतील मौल्यवान वस्तू गायब असल्याचे लक्षात आले.

अज्ञात व्यक्तीने प्रवासादरम्यान फिर्यादी यांच्या संमतीशिवाय त्यांच्या बॅगेतून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल, असा एकूण २ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज लबाडीच्या इराद्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १४४/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ मधील कलम ३०५(सी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार आंबेतकर करीत आहेत. बसमधील प्रवासाचा मार्ग, संभाव्य ठिकाणे आणि उपलब्ध पुराव्यांच्या आधारे अज्ञात चोरट्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande