माथेरानमध्ये गणेशभक्तांना भाजपकडून पूजासाहित्य वाटप
रायगड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माथेरान शहर भाजप शाखेने शहरातील ११५ गणेशभक्तांना २१ प्रकारच्या पूजासाहित्याचे संच भेटस्वरूपात वितरित केले. गणेशभक्तांना पूजेसाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राबविण्यात आले
१३ वर्षांची परंपरा कायम; माथेरानमध्ये गणेशभक्तांना भाजपकडून पूजासाहित्य वाटप


रायगड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर माथेरान शहर भाजप शाखेने शहरातील ११५ गणेशभक्तांना २१ प्रकारच्या पूजासाहित्याचे संच भेटस्वरूपात वितरित केले. गणेशभक्तांना पूजेसाठी आवश्यक साहित्य सहज उपलब्ध व्हावे, या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. गेल्या १३ वर्षांपासून भाजपकडून हा उपक्रम सातत्याने राबविण्यात येत आहे.

भारतीय जनता पार्टीच्या माथेरान शहर शाखेच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात हा उपक्रम आयोजित केला जातो. यंदा माथेरानमध्ये दीड, पाच, सात आणि दहा दिवसांचे मिळून एकूण ११५ गणपती विराजमान होणार आहेत. या सर्व गणेशभक्तांना पूजेसाठी आवश्यक २१ प्रकारच्या वस्तूंचे संच तयार करून भेटस्वरूपात देण्यात आले. डीवाईन कलेक्शन येथे या साहित्याचे वाटप करण्यात आले.

माचीसपासून अत्तरापर्यंत पूजाविधीसाठी आवश्यक विविध वस्तू या संचामध्ये समाविष्ट करण्यात आल्या होत्या. दीड दिवसाच्या गणपतीसाठी आवश्यक तेवढे साहित्य देण्यात आले. तसेच पाच, सात आणि दहा दिवसांच्या गणेशोत्सवासाठी आवश्यकतेनुसार स्वतंत्र संच तयार करून गणेशभक्तांना सुपूर्द करण्यात आले. माथेरानसारख्या पर्यटनस्थळी गणेशोत्सवासाठी आवश्यक पूजासाहित्य सहज उपलब्ध होण्यात अनेकदा अडचणी येतात. शहरात मोठी बाजारपेठ नसल्याने काही वस्तूंसाठी नागरिकांना इतर ठिकाणी जावे लागते. ही अडचण लक्षात घेऊन गणेशभक्तांना आवश्यक साहित्य एकाच संचामध्ये उपलब्ध करून देण्याचा उपक्रम भाजप शाखेकडून राबविण्यात येत आहे.

या वेळी भाजप शहराध्यक्ष प्रवीण सकपाळ, उपनगराध्यक्ष संतोष शेलार, माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव, ज्येष्ठ कार्यकर्ते अरविंद शेलार, किरण चौधरी, शैलेश चाफेरकर, युवा मोर्चाचे शंतनू जमदाडे, महिला आघाडीच्या सुहासिनी शिंदे, नगरसेविका प्रियांका कदम आणि शीतल कदम उपस्थित होते.

माजी उपनगराध्यक्ष चंद्रकांत जाधव म्हणाले की, गणेशभक्तांना उत्सवाच्या काळात पूजासाहित्य मिळविताना कोणत्याही अडचणीला सामोरे जावे लागू नये, या उद्देशाने गेल्या १३ वर्षांपासून हा उपक्रम अविरत सुरू आहे. माथेरानमध्ये मोठी बाजारपेठ नसल्याने आवश्यक वस्तू सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे एकाच ठिकाणी पूजेसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून ते गणेशभक्तांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जात आहे. या उपक्रमाबद्दल गणेशभक्तांनी समाधान व्यक्त करत भाजप शाखेचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande