परभणीत ग्राहक संरक्षण परिषदेवर २४ अशासकीय सदस्यांची नियुक्ती
परभणी, ११ सप्टेंबर (हिं.स.) : ग्राहकांच्या अधिकारांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शासनाने विहित केलेल्या
परभणीत ग्राहक संरक्षण परिषदेवर २४ अशासकीय सदस्यांची नियुक्ती


परभणी, ११ सप्टेंबर (हिं.स.) : ग्राहकांच्या अधिकारांचे संवर्धन आणि संरक्षण करण्याच्या दृष्टीने जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने जिल्हास्तरावर ग्राहक संरक्षण परिषदेची स्थापना करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी शासनाने विहित केलेल्या निकषांनुसार पात्र अर्जदारांची निवड करून विविध क्षेत्रांतील २४ अशासकीय सदस्यांची नियुक्ती केली आहे.

या परिषदेत अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे प्रांताध्यक्ष डॉ. विलास मोरे तसेच मानवत तालुकाध्यक्ष डॉ. सचिन चिद्रवार यांचा अशासकीय सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. परिषदेचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, तर सचिव जिल्हा पुरवठा अधिकारी असणार आहेत.ग्राहकांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून त्यांचे निराकरण करण्यासाठी परिषदेची दर महिन्याला बैठक घेण्यात येणार आहे. परिषदेचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहणार आहे.ग्राहक संघटना प्रतिनिधी म्हणून डॉ. विलास मोरे (सेलू), मधुकर मुळे (पूर्णा), अब्दुल रहीम अब्दुल करीम (परभणी), गंगाधर कान्हेकर (सेलू), श्याम रणेर (रामपुरी खुर्द, ता. पाथरी), गुलाबराव शिंदे (जिंतूर), मंचक जगताप (जिंतूर), सोपान टोले (गंगाखेड), भगवान करंजे (पेठशिवणी) आणि प्रतिभा वाघमारे (गंगाखेड) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

शेतकरी प्रतिनिधी म्हणून गोपाल कच्छवे (दैठणा) आणि गंगाधर देशमुख (बोरी) यांचा, तर वैद्यकीय व्यवसाय प्रतिनिधी म्हणून डॉ. संदीप चव्हाण (परभणी) आणि डॉ. सचिन चिद्रवार (मानवत) यांचा समावेश आहे.शाळा व महाविद्यालय प्रतिनिधी म्हणून प्रा. संगीता आवचार (परभणी) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. व्यापार व उद्योग प्रतिनिधी प्रवर्गातून जनार्धन आवरगंड (ताडकळस), तर पेट्रोल व गॅस विक्रेता प्रवर्गातून रमेश गीते (जिंतूर) यांची नियुक्ती झाली आहे.जिल्हा परिषद सदस्य प्रवर्गातून परमेश्वर निर्वळ (कोल्हा) आणि करुणा कुंडगीर (गुंजगाव), तर पंचायत समिती सदस्य प्रवर्गातून दिलीप काळदाते (ब्राह्मणगाव) आणि विलास गिरी (पूर्णा) यांची निवड करण्यात आली आहे.

नगरपालिका व महापालिका सदस्य प्रवर्गातून अश्विनी जाधव आणि रुकसाना बेगम जागीरदार (परभणी), तर बाजार समिती सदस्य प्रवर्गातून रमेश देशमुख (नागापूर) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ग्राहकांच्या हिताशी संबंधित प्रश्नांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, त्यांच्या तक्रारी व समस्या शासनाच्या निदर्शनास आणून देणे आणि त्यावर आवश्यक कार्यवाही करण्यासाठी ही ग्राहक संरक्षण परिषद महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande