खोलेश्वर महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणपती कार्यशाळेला प्रतिसाद
बीड, 11 सप्टेंबर (हिं.स.)।पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणपती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील असंख्य युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. प्राचार्य डॉ. दी
पर्यावरण पूरक गणपती


बीड, 11 सप्टेंबर (हिं.स.)।पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत अंबाजोगाई येथील खोलेश्वर महाविद्यालयात पर्यावरणपूरक गणपती निर्मिती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेत महाविद्यालयातील असंख्य युवक-युवतींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

प्राचार्य डॉ. दीपक फुलारी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या वतीने या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या रासायनिक रंग व प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींऐवजी नैसर्गिक व पर्यावरणपूरक साहित्याचा वापर करून गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना देण्यात आले.कार्यशाळेदरम्यान विद्यार्थ्यांनी स्वतः गणेशमूर्ती साकारत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता तो पर्यावरणपूरक आणि सामाजिक जाणीव निर्माण करणारा उत्सव व्हावा, यासाठी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलतेसोबतच पर्यावरण रक्षणाची जाणीव निर्माण होण्यास मदत झाली. कार्यशाळेला मिळालेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद हा पर्यावरणपूरक गणेशोत्सवाबाबत वाढत असलेल्या सकारात्मक दृष्टिकोनाचे द्योतक ठरला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande