अंबाजोगाई–परळी मार्गावरील अपघातात तरुण गंभीर जखमी
बीड, ११ सप्टेंबर (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई–परळी मार्गावर कनेरवाडी जवळ गुरुवारी कार आणि दुचाकीची भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई–परळी मार्गावर कनेरवाडी
अपघात


बीड, ११ सप्टेंबर (हिं.स.) : बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई–परळी मार्गावर कनेरवाडी जवळ गुरुवारी कार आणि दुचाकीची भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अंबाजोगाई–परळी मार्गावर कनेरवाडी परिसरात मोटरसायकल आणि कारची जोरदार धडक झाली. अपघाताची तीव्रता मोठी असल्याने दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

अपघातग्रस्त दुचाकीचा क्रमांक एमएच 44 एजे 5781, तर कारचा क्रमांक एमएच 30 बीएल 3988 असा आहे.

अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

------------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande