
लातूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
तालुक्यातील मुदत संपलेल्या २५ ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका वेळेत न झाल्याने संबंधित ग्रामपंचायतींचा कारभार आता प्रशासकांच्या माध्यमातून चालणार आहे. त्यामुळे गावपातळीवरील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणखी लांबणीवर पडल्याचे चित्र आहे.
प्रशासक म्हणून संबंधित विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रशासकांकडे ग्रामपंचायतीचा
दैनंदिन कारभार, विकासकामे, आवश्यक प्रशासकीय निर्णय तसेच नागरिकांच्या मूलभूत सुविधांशी संबंधित कामकाजाची जबाबदारी राहणार आहे.
ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार, याकडे आता संबंधित गावांतील इच्छुक उमेदवारांसह ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. दरम्यान साकोळ ए.एस. गायकवाड, कानेगाव ए.एस. गायकवाड, तीपराळ ए. एस. गायकवाड, सांगवी घुगी ए. आय. पागे, येरोळ पी. बी. घोडके, सुमठाणा डी.बी. व्होट्टे, शेंद डी.बी. व्होट्टे, चामरगा पी.बी. घोडके, बोळेगाव बु. एम. व्ही. सूर्यवंशी, धामणगाव ए. एस. गायकवाड, कारेवाडी पी. बी. घोडके, हिप्पळगाव एम. व्ही.
सूर्यवंशी, शिवपूर एम. व्ही. सूर्यवंशी, थेरगाव डी. बी. व्होट्टे, हालकी ए. आय. पागे, डोंगरगाव बोरी ए. आय. पागे, कांबळगा एम. व्ही. सूर्यवंशी, तळेगाव दे. ए. एस. गायकवाड, होनमाळ पी. बी. घोडके, कळमगाव ए. एस. गायकवाड, भिगोली एम. व्ही. सूर्यवंशी, अंकुलगा सय्यद ए. आय. पागे, बिबराळ डी. बी. व्होट्टे, लक्कड जवळगा ए. आय. पागे, जोगाळा डी. बी. व्होट्टे हे प्रशासक म्हणून काम पाहणार आहेत. २५ ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्त झाल्याने आगामी काळात ग्रामपंचायत निवडणुकांचा कार्यक्रम कधी जाहीर होतो, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis