गुजरात राज्यातून बसमधून आलेली लाखो रुपयाची भेसळयुक्त बर्फी जप्त
नाशिक, 11 सप्टेंबर (हिं.स.)। - अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने द्वारका चौकामध्ये छापा टाकून लाखो रुपयाची गुजरात राज्यातून आलेली भेसळयुक्त बर्फी पकडण्यात आली असून यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राज्यव्यापी
Adulterated barfi worth lakhs


नाशिक, 11 सप्टेंबर (हिं.स.)।

- अन्न व औषध प्रशासन विभागाच्या वतीने द्वारका चौकामध्ये छापा टाकून लाखो रुपयाची गुजरात राज्यातून आलेली भेसळयुक्त बर्फी पकडण्यात आली असून यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे.

सध्या अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने राज्यव्यापी मोहिमेअंतर्गत सणासुदीच्या दिवसांच्या दृष्टीने विविध अन्न पदार्थांबाबत मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमे अंतर्गत नाशिक जिल्ह्यामध्ये सलग तिसऱ्या दिवशी नाशिकच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने मोठी कारवाई केली आहे.

याबाबत या विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार गुजरातवरुन अवैधरीत्या स्पेशल स्वीट बर्फीची नाशिक शहरामध्ये वाहतूक होत असतांनाच अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शुक्रवारी पहाटेच्या वेळी द्वारकाचौकात श्री विजय बस क्रमांक एआर 11 जी 5454 व बलदेव एएस 01 क्युसी 5678 या २ खाजगी बसमधून २१५५ कि. ग्रॅ. किंमत रु. ५ लाख ५८ हजार २६७ रुपये किंमतीची स्पेशल स्वीट बर्फीचा साठा जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा मानके कायदा नुसार अस्वच्छ वातावरण व विनापरवाना बसमधून अवैधरीत्या वाहतूक केल्यामुळे तसेच दिलेल्या तापमानाची अट पुर्ण न केल्यामुळे हा साठा जप्त करुन नष्ट करण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / MANAS CHANDRASHEKHAR GOSAVI


 rajesh pande