
यवतमाळ, 11 सप्टेंबर (हिं.स.)
जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल खत्री यांनी पदभार स्वीकारला आहे. परंतु पदभार स्वीकारल्यानंतर विधीमंडळ समिती जिल्ह्यात आली आहे. या समितीच्या दौर्!यात त्यांना गुंतावे लागले आहे. तरीसुद्धा त्यांनी महिला व बालकल्याण विभागाचा आढावा घेतला. आता मंगळवार (ता. १५) पासून विभागनिहाय आढावा घेणार आहेत. तब्बल अडीच महिन्यानंतर जिल्हा परिषदेचा प्रभारीराज संपुष्टात आला आहे. कामाजाची गती पूर्णत: मंदावलेली होती. आता मात्र विशाल खत्री यांची मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. तर मंगळवारी (ता. आठ) त्यांनी जिल्हा परिषदेचा कारभार हातीसुद्धा घेतला आहे. आता जिल्हा परिषदेची विस्कटलेली घडी पूर्णत: दुरुस्त होईल. मात्र, विधीमंडळ अंदाज समिती तीन दिवसीय दौर्!यानिमित्त जिल्ह्यात येण्याचे निश्चित झाले होते. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकांना हजेरी लावण्याची वेळ त्यांच्यावर आली होती. असे असलेतरी बुधवारी (ता. नऊ) सकाळी त्यांनी महिला व बालकल्याण विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. आता सलग तीन दिवस समिती आणि त्यानंतर तीन दिवस शासकीय सुट्ट्या आल्यामुळे थेट मंगळवारीच जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू होईल. त्यामुळे मंगळवारपासून विविध विभागाच्या आढाव्याचा धडाका ते घेणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यामुळे आगामी काळात जिल्हा परिषदेचे कामकाज गतीमान पद्धतीने होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
‘पेंडिंग’ कामे येणार अंगलट
जिल्हा परिषदेचा कारभार आता ई-ऑफिसच्या माध्यमातून सुरू आहे. तरीसुद्धा काही विभागातील कर्मचार्!यांकडे कामांची पेन्डसी मोठ्या प्रमाणात आहे. जिल्हा परिषदेची जबाबदारी प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकार्!यांवर असल्यामुळे अनेकांनी कामकाजाकडे दुर्लक्ष केले होते. आता मात्र नियमित सीईओ आल्यामुळे कारवाईची कुर्!हाड कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे कर्मचार्!यांमध्ये पेंडिंग कामे निकाली काढण्याची लगबग पहावयास मिळत आहे.
---------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी