चंद्रपुरात शनिवारी दहीहंडी, वेशभूषा व महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन
चंद्रपूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। ‘द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘बाळूभाऊ मित्र परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर शहरातील न्यू इंग्लिश शाळेचे मैदान, वरोरा नाका चौक येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विश
चंद्रपुरात शनिवारी दहीहंडी, वेशभूषा व महिलांसाठी रस्सीखेच स्पर्धेचे आयोजन


चंद्रपूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)।

‘द मराठा चॅरिटेबल ट्रस्ट’ आणि ‘बाळूभाऊ मित्र परिवार’ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या, शनिवार, १२ सप्टेंबर २०२६ रोजी चंद्रपूर शहरातील न्यू इंग्लिश शाळेचे मैदान, वरोरा नाका चौक येथे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या विशेष उपस्थितीत वेध मराठी मनाचा, उत्सव चंद्रपूरकरांचा या संकल्पनेखाली भव्य सांस्कृतिक व क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या महोत्सवांतर्गत भव्य 'भाऊंची दहीहंडी', ५ ते १० वर्षे वयोगटातील बालगोपाळांसाठी 'वेशभूषा स्पर्धा' तसेच महिलांसाठी 'रस्सीखेच स्पर्धा' अशा विविध आकर्षक स्पर्धा रंगणार आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande