यवतमाळ - एसटीच्या कार्डसाठी अतिरिक्त पैशाची मागणी
यवतमाळ, 11 सप्टेंबर (हिं.स.)। राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या एसटीमधील सवलतीच्या प्रवासासाठी एक सप्टेंबर पासून ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरीक व महिलांना बसने प्रवास करण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आह
एसटीच्या कार्डसाठी अतिरिक्त पैशाची मागणी


यवतमाळ, 11 सप्टेंबर (हिं.स.)।

राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या एसटीमधील सवलतीच्या प्रवासासाठी एक सप्टेंबर पासून ६५ ते ७५ वर्षांपर्यंतच्या ज्येष्ठ नागरीक व महिलांना बसने प्रवास करण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अर्थात स्मार्ट कार्ड अनिवार्य केले आहे. सवलतीचा लाभ घ्यावयाचा असेल तर कार्ड सक्तीचे केल्याने कार्ड नोंदणी केंद्राला चांगलाच भाव आला आहे. प्रति कार्ड १९९ रुपये आकारण्याचे नियम असताना तब्बल ३०० रुपये घेतले जात असल्याचे दिसून आले आहे. गावापासून पुसदचे अंतर व जाण्यायेण्याचा खर्च पाहता प्रवासीही मुकपणे वाढीव रक्कम देऊन काम करुन घेत आहेत. मात्र, ही निव्वळ पिळवणूक असल्याची ओरडही होत आहे.

विशेष म्हणजे कार्ड काढणार्!यांच्या गर्दीत सर्वसामान्य चेहरेच अधिक असल्याने त्यांना या जादा रकमेचा भुर्दंडच सोसावा लागत आहे. कार्ड हाती आल्यावर त्यात टॉपअपचा खर्च वेगळाच, त्यासाठीही अतिरिक्त पैशाची लूट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वाहतूक कक्षाच्या अधिका-यांनी याकडे लक्ष पुरवून कार्ड काढण्यासाठी होत असलेल्या गर्दीतील सर्वसामान्य प्रवाशांची लूट होऊ नये, याकडे लक्ष पुरवावे, अशी मागणी होत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande