
वर्धा, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
कापूस खरेदी करून धनादेशाद्वारे रक्कम अदा करण्याचे आश्वासन देऊन शेतकऱ्यांना ९१ लाख २१ हजार ४९६ रुपयांचा गंडा घालण्यात आला. या प्रकरणी सेलू तालुक्यातील हिंगणी येथील सर्वज्ञ जिनिंग अॅण्ड प्रेसिंगचे संचालक प्रवीण बोरकुटे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. सर्वज्ञ जिनिंग अॅण्ड प्रेसिंगचे संचालक प्रवीण बोरकुटे यांनी हिंगणीसह परिसरातील शेतकऱ्यांकडून एकूण १, १०३.७० क्विटल कापूस खरेदी कला. सदर कापसाचे एकूण खरेदी ९१ लाख २१ हजार ४९६ रुपये शेतकऱ्यांना देणे आहे. शेतकऱ्यांना या या खरेदीच्या पावत्याही दिल्या. सोबत रकमेचे धनादेश दिले. मात्र, प्रवीण बोरकुटेच्या बॅक खात्यामध्ये पुरशी रक्कम उप्लब्ध नसल्याने सदर धनादेश अनादरीत झाले. त्यानंतर संबंधित पीडित शेतकऱ्यांना देय रक्कमेबाबत जिनिंग मालकाला विचारणा केली असता दिलेले धनादेश परत घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या बँक खात्यावर रक्कम जमा करतो, असे सांगितले. त्यानंतरही शेतकऱ्यांना त्यांच्या कापसाची रक्कम देण्यात आली नाही. या प्रकरणी शेतकऱ्यांीची फसवणूक झाल्याच्या तक्रारीवरून सेलू पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
शेतकरी, नागरिकांना आवाहन सदर प्रकरणातील संबंधित व्यक्ती/ जिनिंगला कापूस विक्री केलेला आहे. त्यांना अद्याप कापसाची रक्कम मिळाली नाही. अशा पीडित शेतकरी किंवा व्यक्तींनी कापूस खरदी पावती, देण्यात आलेले धनादेश, धनादेश वटला नसल्यास संबंधित कागदपत्रे पुराव्यासह आर्थिक गुन्ह शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी