बालमृत्यू प्रकरणी सा.बां. विद्युत विभागाची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी
अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.) अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या भीषण अग्नितांडवात निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमागील प्रशासकीय, तांत्रिक व कंत्राटी जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक क
बालमृत्यू प्रकरणी PWD विद्युत विभागाची जबाबदारी निश्चित करा


अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.)

अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात झालेल्या भीषण अग्नितांडवात निष्पाप बालकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमागील प्रशासकीय, तांत्रिक व कंत्राटी जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व काँग्रेस पदाधिकारी समीर जावंजळ यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, वायरिंग, डी.पी.वरील उच्चदाब व्यवस्था, विद्युत देखभाल-दुरुस्ती तसेच फायर सेफ्टीशी संबंधित बाबींमध्ये PWD विद्युत विभागाची महत्त्वपूर्ण भूमिका असल्याने दुर्घटनेपूर्वी संबंधित अधिकाऱ्यांनी केलेल्या सुरक्षा तपासण्या व देखभाल-दुरुस्तीची स्वतंत्र चौकशी करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

PWD विद्युत विभागातील कार्यकारी अभियंता रा. कु. शेंडे तसेच प्रभारी कार्यकारी अभियंता विनोद गौऊकर यांच्या दुर्घटनेपूर्वीच्या भूमिकेची व कर्तव्यपालनाची विभागीय चौकशी करावी, असेही निवेदनात नमूद आहे.तसेच मे. साई बालाजी असोसिएट्स या इलेक्ट्रिकल कंत्राटदाराची निविदा पात्रता, परवाना, ब्लॅकलिस्ट स्थिती, कामांची मंजुरी, प्रत्यक्ष कामाची गुणवत्ता आणि अदा केलेल्या बिलांची स्वतंत्र तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.रुग्णालयातील विद्युत यंत्रणा, वायरिंग व फायर सेफ्टीचे स्वतंत्र तांत्रिक ऑडिट करावे. मागील काही वर्षांतील विद्युत देखभाल-दुरुस्ती कामांचे विशेष ऑडिट करून निष्काळजीपणा किंवा नियमभंग सिद्ध झाल्यास संबंधित अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर प्रशासकीय व फौजदारी कारवाई करावी, अशी मागणी जावंजळ यांनी केली.निवेदन देतेवेळी ॲड. कार्तिक देशमुख, अनिकेत जावरकर, ॲड. ऋतुराज मोरे आदी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande