
बीड, 11 सप्टेंबर, (हिं.स.)।
दिंद्रुड पोलीस ठाण्याचे कर्तव्यदक्ष प्रभारी अधिकारी तथा सहायक पोलीस निरीक्षक महेश भोसले यांनी अवैध धंद्यांवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवत केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेण्यात आली आहे. त्यांच्या कार्याबद्दल बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक नवनीत . काँवत यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन
दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्याबरोबरच कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांकडून सातत्याने कारवाई करण्यात येत आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेत त्यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. महेश भोसले यांना प्रशस्तीपत्र मिळाल्याबद्दल पोलीस सहकारी, मित्रपरिवार तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अवैध धंद्यांवर असलेला त्यांचा वचक कायम राहावा आणि त्यांच्याk पुढील वाटचालीस यश मिळावे, अशा शुभेच्छाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis