
छत्रपती संभाजीनगर, 11 सप्टेंबर (हिं.स.)।
परवानगी नाही दिली तरी मुंबईला जाणार असे मनोज जरांगे यांनी आज सांगितले आहे. मुद्दा पाऊस नाही, अडीअडचणी आहेत, त्यामुळे महिलांनी येऊ नका. गाव सांभाळले तरी खूप झाले, आरक्षणाचे आणि शेतीचे पण संकट आहे. सर्व गावकऱ्यांनी वर्गणी करून गाड्या लावायच्या. एका तालुक्यात आपण लाखापेक्षा कमी नाहीत, सरकारचे नाक दाबल्याशिवाय तोंड उघडणार नाही, असे म्हणत जरांगे पाटलांनी आता मुंबईला जाण्याचा निर्धार केला असून सरकारला थेट इशाराच दिलाय. ज्यादिवशी तारीख ठरेल त्या दिवशी काम सोडून रस्त्यावर या. मुंबईत आम्हाला त्रास झाला तर जागोजाग रस्ते अडवून ठेवा, सणावाराचे दिवस आहेत, आपला जाण्याचं त्याच वेळेत ठरणार आहे. मागच्या वेळी परवानगी नाकारली, यावेळी ते नाकारणार नाहीत. परवानगी दिली आणि नाही दिली तरी मुंबईला जाणार असा इशाराच जरांगे पाटलांनी दिला. तसेच, न्याय देवता गोरगरिबांच्या लेकरावर अन्याय करत नाही, असेही त्यांनी म्हटले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis