परभणी - महानगरपालिका कर्मचाऱ्यांचा बंद अखेर स्थगित; वेतन 15 सप्टेंबर पर्यंत मिळणार
परभणी, 11 सप्टेंबर (हिं.स.)। परभणी महानगरपालिका अंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीएसटी वाढीव अनुदानासह जीएसटीची फरकाची रक्कम तसेच गेल्या सहा महिन्यांपासूनचे थकीत वेतन तातडीने मिळावे या मागणी करता 10 ऑगस्ट पासून सुरू केलेले बेमुदत काम बंद आंदोलन आज 1
अ


परभणी, 11 सप्टेंबर (हिं.स.)।

परभणी महानगरपालिका अंतर्गत अधिकारी कर्मचाऱ्यांनी जीएसटी वाढीव अनुदानासह जीएसटीची फरकाची रक्कम तसेच गेल्या सहा महिन्यांपासूनचे थकीत वेतन तातडीने मिळावे या मागणी करता 10 ऑगस्ट पासून सुरू केलेले बेमुदत काम बंद आंदोलन आज 11 सप्टेंबर रोजी स्थगित केले.

महानगरपालिकेचा आयुक्त नितीन नार्वेकर, महापौर सय्यद खाजा उपमहापौर गणेश देशमुख, ज्येष्ठ नगरसेवक भगवान वाघमारे, गुलमीर खान आकाश लहाने, विनोद कदम,यांच्यासह अन्य महापालिके अंतर्गत ज्येष्ठ नगरसेवक व युनियनच्या नेते मंडळींनी आज संयुक्त बैठकीतून दोन महिन्याचे वेतन तातडीने 15 सप्टेंबर पर्यंत वितरित केले जाईल, उर्वरित चार महिन्याचे वेतन 30 दिवसांच्या आत दिले जाईल तसेच जीएसटीच्या वाढू अनुदानासह जीएसटीच्या फरकाची रक्कम तातडीने मिळावी यासाठी एक समिती स्थापन करीत मंत्रालय स्तरावर भक्कम असा पाठपुरावा केला जाईल असा ठोस निर्णय घेतला. त्या पाठोपाठ सणासुदीच्या काळातील संप स्थगित केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande