
जळगाव, 11 सप्टेंबर (हिं.स.) स्वामी विवेकानंद यांनी 11 सप्टेंबर 1983 रोजी अमेरिकेतील शिकागो येथे जागतिक धर्म संसदेत केलेल्या ऐतिहासिक भाषणातून दिलेला सर्वधर्मसमभाव, सहिष्णुता, मानवता, परस्पर सन्मान आणि विश्वबंधुत्वाचा संदेश समाजातील विविध घटकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने दि. 11 ते 26 सप्टेंबर या कालावधीत विश्वबंधुत्व पंधरवाडा साजरा करण्यात येणार आहे. सन 2026 पासून दरवर्षी हा पंधरवाडा आयोजित करण्यात येणार असून बदलत्या सामाजिक व जागतिक परिस्थितीत सामाजिक ऐक्य, सहिष्णुता, सन्मान आणि बंधुभावाची मूल्ये अधिक दृढ करण्यावर या अभियानात भर देण्यात येणार आहे, असे जिल्हा व्यवस्थापक, महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), जळगाव यांनी कळविले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर