परमेश्वर सातपुते यांची उबाठाच्या लातूर जिल्हा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती
बीड, 11 सप्टेंबर (हिं.स.)। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनेचे माजी बीड जिल्हाप्रमुख परमेश्वर सातपुते यांची लातूर जिल्हा संपर्कप्रमुख (कार्य क्षेत्र-लातूर लोकसभा मतदारसंघ) म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
परमेश्वर सातपुते

परमेश्वर सातपुते यांनी शिवसेनेमध्ये शाखाप्रमुख, किसान सेना जिल्हाप्रमुख आणि बीड जिल्हाप्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. तसेच सरपंच व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी आंदोलने, निवेदने तसेच प्रत्यक्ष जनतेमध्ये जाऊन त्यांनी सातत्याने काम केले आहे. बीड जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी ग्रामीण भागातील शिवसैनिकांना संघटित करून पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविण्यासाठी प्रयत्न केले आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis

 rajesh pande