यंदाच्या गणेशोत्सवातील पहिली मोदी एक्स्प्रेस मुंबईतून रवाना
मुंबई, 11 सप्टेंबर (हिं.स.) ।गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणवासीय चाकरमान्यांकरिता सोडलेली दादर ते सावंतवाडी पहिली मोदी एक्स्प्रेस आज दुपारी १२ वाजता दादर स्टेश
मोदी एक्स्प्रेसमधील प्रवाशांना शुभेच्छा देताना मंत्री नितेश राणे


मुंबई, 11 सप्टेंबर (हिं.स.) ।गणेशोत्सवाच्या निमित्ताने राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्हा पालकमंत्री नितेश राणे यांनी कोकणवासीय चाकरमान्यांकरिता सोडलेली दादर ते सावंतवाडी पहिली मोदी एक्स्प्रेस आज दुपारी १२ वाजता दादर स्टेशनवरून कोकणाकडे रवाना झाली. प्रवाशांच्या उत्साहात, बाप्पाच्या जयघोषात ही गाडी रवाना झाली. मंत्री नितेश राणे यांनी दादर स्टेशनवर मोदी एक्स्प्रेसला झेंडा दाखवला.

गणेशोत्सवाच्या काळात आरक्षण मिळत नसल्याने तसेच खासगी गाड्यांचे वाढलेले तिकीट यामुळे चाकरमान्यांना तिकीट मिळण्यास अडचणी निर्माण होतात. अशा वेळी मोदी एक्स्प्रेसमुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. प्रवाशांचा प्रवास सुखकर आणि सुरक्षित होण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला आहे.

गेली १४ वर्षे अविरतपणे मंत्री होण्याच्या पूर्वीपासून नितेश राणे स्वखर्चाने गणेशभक्तांना प्रवासाची मोफत सुविधा देत आहेत. यावर्षीची दुसरी मोदी एक्स्प्रेस रविवारी, दि. 13 सप्टेंबर रोजी रवाना होणार आहे.

दरवर्षी राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल गणेशभक्तांनी समाधान व्यक्त करत मंत्री नितेश राणे यांचे आभार मानले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande