अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना : छ. संभाजी नगर तिसऱ्या यादीत १९ हजार २४३ शेतकरी पात्र
छत्रपती संभाजीनगर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. योजनेच्या पोर्टलवर आज (दि.११) तिसरी यादी प्रसि
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना : छ. संभाजी नगर तिसऱ्या यादीत १९ हजार २४३ शेतकरी पात्र


छत्रपती संभाजीनगर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’ अंतर्गत लाभ मिळण्यासाठी पात्र शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) तातडीने पूर्ण करणे आवश्यक आहे. योजनेच्या पोर्टलवर आज (दि.११) तिसरी यादी प्रसिद्ध करण्यात आली असून, त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १ हजार १०५ गावांमधील १९ हजार २४३ पात्र शेतकऱ्यांचा समावेश आहे. संबंधित शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’त जाऊन आधार प्रमाणीकरण पूर्ण करावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर यांनी केलेआहे.

कर्जमुक्ती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व बँकांनी १ लाख ९० हजार ७०१ शेतकऱ्यांची माहिती कर्जमाफी पोर्टलवर अपलोड केली आहे. त्यापैकी आतापर्यंत १ लाख २३ हजार १३० शेतकऱ्यांची विशिष्ट क्रमांकासह यादी आधार प्रमाणीकरणासाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे. आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांपैकी ७४ हजार डी९४५ शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांमध्ये ५१८ कोटी रुपयांची रक्कम जमा होऊन त्यांची कर्जखाती निरंक करण्यात आली आहेत.

आज प्रसिद्ध झालेल्या तिसऱ्या यादीमध्ये जिल्ह्यातील १ हजार १०५ गावांतील एकूण १९ हजार २४३ पात्र शेतकऱ्यांचा समावेश असून, त्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १ हजार ७७४ शेतकऱ्यांचा समावेश आहे. पात्र शेतकऱ्यांच्या याद्या संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, आपले सरकार सेवा (ASSK) केंद्र, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय तसेच सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

लाभार्थी शेतकऱ्यांनी संबंधित यादीमध्ये आपले नाव असल्याची खात्री करावी. त्यानंतर ॲग्रीस्टॅक क्रमांक, मूळ आधारकार्ड आणि बचत खात्याचे पासबुक घेऊन जवळच्या आपले सरकार सेवा केंद्रात प्रत्यक्ष उपस्थित राहून आधार प्रमाणीकरण (ई-केवायसी) तातडीने पूर्ण करावे. योजनेचा लाभ मिळण्यासाठी आधार प्रमाणीकरण पूर्ण करणे अत्यावश्यक व बंधनकारक आहे.

यासंदर्भात अधिक माहितीसाठी संबंधित बँक शाखा, विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, छत्रपती संभाजीनगर तसेच संबंधित उप/सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande