तृतीयपंथीयांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन उत्कर्ष साधावा : संजयसिंह चव्हाण
परभणी, ११ सप्टेंबर (हिं.स.) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तृतीयपंथीयांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेऊन तृतीयपंथीयांनी स्वावलंबी होऊन आपला उत्कर्ष साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजय
तृतीयपंथीयांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन उत्कर्ष साधावा : संजयसिंह चव्हाण


परभणी, ११ सप्टेंबर (हिं.स.) : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत तृतीयपंथीयांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेऊन तृतीयपंथीयांनी स्वावलंबी होऊन आपला उत्कर्ष साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी केले.

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालय, परभणी आणि सप्तरंग सेवाभावी संस्था, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने ‘तृतीयपंथीयांचे हक्काचे संरक्षण व कल्याण योजना’ अंतर्गत तृतीयपंथीयांसाठी कार्यशाळा व आरोग्य शिबिराचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून जिल्हाधिकारी चव्हाण बोलत होते.

यावेळी सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्ष डॉ. सान्वी जेठवाणी, महानगरपालिका आयुक्त नितीन नार्वेकर, अपर जिल्हाधिकारी शोभा जाधव, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त राजू एडके, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी ईप्पर, जिल्हा पुरवठा अधिकारी विलास मुसळे, पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

समान आरोग्य सुविधा व सन्मानाने जगण्याचा अधिकार

समाजातील प्रत्येक घटकाला समान आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षितता आणि सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार आहे. तृतीयपंथीय समुदायाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण, रोजगार, कौशल्य विकास आणि सामाजिक सुरक्षितता या क्षेत्रांत सातत्याने प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे यावेळी अधोरेखित करण्यात आले.

शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन तृतीयपंथीयांनी स्वावलंबी होण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी सांगितले.

कार्यशाळेत तृतीयपंथीय समाजाच्या हक्कांचे संरक्षण, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना, रोजगाराच्या संधी, कौशल्य विकास, आरोग्यविषयक जनजागृती तसेच कायदेविषयक बाबींवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, उपलब्ध सुविधा आणि विविध विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहितीही देण्यात आली.

आरोग्य शिबिरात तृतीयपंथीयांची आरोग्य तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन करण्यात आले. नियमित आरोग्य तपासणी, आजारांपासून बचावासाठी प्रतिबंधात्मक

---------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande