मोरे यांच्यावरील कथित हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेस आक्रमक
दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी अमरावतीत निदर्शने अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर नागपूर येथे पोलिसांकडून कथितरीत्या झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती शहर युवक काँग्रेसच्या वतीन
शिवराज मोरे यांच्यावरील कथित पोलिस हल्ल्याच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे आंदोलन


दोषींवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी अमरावतीत निदर्शने

अमरावती, 11 सप्टेंबर (हिं.स.)। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर नागपूर येथे पोलिसांकडून कथितरीत्या झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ अमरावती शहर युवक काँग्रेसच्या वतीने निदर्शने करण्यात आली. घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या गृहमंत्र्यांना देण्यात आले.

गेल्या

९ सप्टेंबर रोजी नागपूर येथील संघ कार्यालयावर युवक काँग्रेसच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी मोरे यांच्यावर पोलिसांकडून कथितरीत्या हल्ला झाल्याचा आरोप युवक काँग्रेसने केला आहे.

घटनेची वस्तुस्थिती स्पष्ट करण्यासाठी CCTV फुटेज, व्हिडिओ रेकॉर्डिंग व अन्य पुराव्यांची तातडीने तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली. तसेच मोरे यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना करून त्यांना शासकीय सुरक्षा देण्याची मागणीही करण्यात आली.

सरकारने तातडीने कारवाई न केल्यास राज्यभर आंदोलन छेडण्याचा इशारा युवक काँग्रेसने दिला. यावेळी सरकार व पोलिस प्रशासनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलनात युवक काँग्रेस व एनएसयूआयचे पदाधिकारी सहभागी झाले होते.

-------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande