सैन्यदलातील अधिकारी पदासाठी मोफत एसएसबी पूर्व प्रशिक्षण; १७ सप्टेंबरला मुलाखत
सोलापूर, ११ सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) पूर्व प्रशिक्षणाचा मोफत कोर्स आयोजित करण्यात आला आहे. छात्रपूर्व प्रशिक
सैन्यदलातील अधिकारी पदासाठी मोफत एसएसबी पूर्व प्रशिक्षण; १७ सप्टेंबरला मुलाखत


सोलापूर, ११ सप्टेंबर (हिं.स.)। भारतीय सैन्यदल, नौदल आणि वायुदलात अधिकारी पदावर भरती होऊ इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड (SSB) पूर्व प्रशिक्षणाचा मोफत कोर्स आयोजित करण्यात आला आहे. छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथे २१ ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत SSB कोर्स क्रमांक ६६ घेण्यात येणार आहे. या प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षणासह निवास व भोजनाची सुविधा नि:शुल्क उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

सोलापूर जिल्ह्यातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या प्रशिक्षणासाठी १७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, सोलापूर येथे मुलाखतीस उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले आहे.

मुलाखतीसाठी येताना उमेदवारांनी सैनिक कल्याण विभाग, पुणे (DSW) यांच्या संकेतस्थळावरील DSW Portal → Resources → PCTC Nashik → SSB 66 या विभागातून प्रवेशपत्र व त्यासोबतची परिशिष्टे डाउनलोड करून त्यांची प्रिंट काढावी. तसेच आवश्यक माहिती भरून संबंधित कागदपत्रे मुलाखतीच्या वेळी सोबत आणावीत.

प्रशिक्षणासंदर्भात अधिक माहितीसाठी छात्रपूर्व प्रशिक्षण केंद्र, नाशिक रोड येथील प्रभारी अधिकाऱ्यांशी training.pctcnashik@gmail.com या ई-मेलवर किंवा ०२५३-२४५१०३२ या दूरध्वनी क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधता येईल. तसेच ९१५६०७३३०६ या व्हॉट्सॲप क्रमांकावरही माहिती घेता येईल, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, सोलापूर यांनी कळविले आहे.

------------------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande