
सोलापूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)।महिलांविषयी अपशब्द वापरल्याच्या आरोपावरून संतोष पंडित यांच्याविरोधात तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिस प्रशासनाने तत्परता दाखवली. त्याच धर्तीवर महिलांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप असलेले आमदार संजय गायकवाड यांच्याविरोधातही तातडीने कारवाई करावी. तसेच गायकवाड यांच्याविरोधात तत्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी कांबळे यांनी पत्रकार परिषदेत केली.
पोलिसांनी कारवाई करताना दुजाभाव करू नये, असेही त्यांनी म्हटले.‘शिवाजी कोण होता’ या पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवरून अश्लील शिवीगाळ केल्याचा आरोप कांबळे यांनी केला. या प्रकरणाकडे लक्ष वेधत त्यांनी गायकवाड यांच्या वक्तव्यांबाबत पोलिस प्रशासनाने गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी केली.कांबळे म्हणाल्या की, ५ सप्टेंबर रोजी त्या पतीसोबत दहीहंडीचा कार्यक्रम पाहण्यासाठी गेल्या होत्या. यावेळी घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. महिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये करणाऱ्यांवर कायद्यानुसार समान पद्धतीने कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड