
सोलापूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। शहरातील इंदिरा गांधी स्टेडियमवर ऑक्टोबर २०२६ ते जानेवारी २०२७ या कालावधीत बीसीसीआयच्या विविध स्पर्धांमधील पाच सामने रंगणार आहेत.
यामध्ये सी. के. नायडू ट्रॉफी आणि कूच बिहारी ट्रॉफीच्या सामन्यांचा समावेश आहे. या सामन्यांचे वेळापत्रकही जाहीर झाले असून, सोलापूरच्या क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.इंदिरा गांधी स्टेडियमचे झालेले नूतनीकरण, दर्जेदार खेळपट्टी आणि हिरवेगार आऊटफिल्ड यामुळे सोलापूरचे मैदान क्रिकेट सामन्यांसाठी अधिक सक्षम झाले आहे. त्याचबरोबर सोलापूरची भौगोलिक परिस्थिती आणि तुलनेने कमी पावसाचे प्रमाण यामुळे सामन्यांचे आयोजन करण्यासाठी हे मैदान महत्त्वाचे ठरत आहे.२०२२ ते २०२६ या कालावधीत इंदिरा गांधी स्टेडियमवर झालेल्या विविध सामन्यांचे यशस्वी आयोजन झाल्याने सोलापूरच्या मैदानाची क्रिकेट विश्वातील ओळख अधिक मजबूत झाली आहे. आता बीसीसीआयच्या पाच सामन्यांमुळे या मैदानाच्या लौकिकात आणखी भर पडणार आहे.सोलापूरमध्ये सातत्याने मोठ्या क्रिकेट स्पर्धांचे सामने आयोजित होत असल्याने शहराचे क्रिकेट केंद्र म्हणून महत्त्व वाढत आहे. आगामी सामन्यांकडे स्थानिक क्रिकेटप्रेमींसह खेळाडू आणि क्रीडा क्षेत्राचेही लक्ष लागले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड