मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला पाठिंबा; उळे येथे सकल मराठा समाजाचा रास्ता रोको
सोलापूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)। मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उळे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सोलापूर–येडशी राष्ट्रीय
fgdf


सोलापूर, 11 सप्टेंबर (हिं.स.)।

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उळे येथे सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. सोलापूर–येडशी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील ब्रीजवर शुक्रवारी हे आंदोलन करण्यात आले.

सकाळी साडेदहा वाजता सुरू झालेले रास्ता रोको आंदोलन सुमारे अकरा वाजता शांततेत मागे घेण्यात आले. या काळात महामार्गाच्या दोन्ही दिशांवरील चारही लेनमधील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.

कासेगाव, उळे, वडजी, बोरामणी, गंगेवाडी, बक्षीहिप्परगे, हगलूर, होनसळ, उळेवाडी यांसह पंचक्रोशीतील विविध गावांमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले होते.

यावेळी आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘जितेंगे लढेंगे, हम सब जरांगे’, ‘मनोज दादा, तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’, ‘आता कुठे जायचं? मुंबईला जायचं’ अशा घोषणा दिल्या.

आंदोलन सुरू करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शिवरायांची आरती करून उपस्थितांनी प्रतिमेला मानाचा मुजरा केला. यानंतर सकल मराठा समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

दरम्यान, आंदोलन शांततेत मागे घेण्यात आल्यानंतर महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande