ठामपाची सिंगल यूज प्लास्टिकविरोधात धडक कारवाई; 99 किलो प्लास्टिक जप्त
ठाणे, 11 सप्टेंबर (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. या कारवाईत 75 आस्थापंना
ठामपाची सिंगल यूज प्लास्टिकविरोधात धडक कारवाई; 99 किलो प्लास्टिक जप्त


ठाणे, 11 सप्टेंबर (हिं.स.)। ठाणे महानगरपालिका क्षेत्रात सिंगल यूज प्लास्टिकचा वापर आणि विक्री करणाऱ्यांविरोधात महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने कारवाई करण्यात आली. या कारवाईत 75 आस्थापंनाची तपासणी करुन 99 किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करुन 79000 रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.

या मोहिमेंतर्गत माजिवडा-मानपाडा, मुंब्रा आणि नौपाडा-कौपरी प्रभाग समिती क्षेत्रात विशेष पथकांमार्फत बाजारपेठा, व्यावसायिक आस्थापना, फेरीवाले आणि दुकानांची तपासणी करण्यात आली. प्रतिबंधित सिंगल यूज प्लास्टिक आढळून आलेल्या संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून प्लास्टिक जप्त करण्यात आले.

माजिवडा-मानपाडा प्रभाग समिती क्षेत्रात एकूण 35 आस्थापनांना दिलेल्या भेटीत 18 किलो प्लास्टिक जप्त करुन 18 हजार इतका दंड आकारण्यात आला. मुंब्रा प्रभाग समिती क्षेत्रात एकूण 10 आस्थापनांना दिलेल्या भेटीत 27 किलो प्लास्टिक जप्त करुन 15 हजार इतका तर नौपाडा कोपरी प्रभाग समिती क्षेत्रात 30 आस्थापनांना भेटी देवून 54 किलो प्लास्टिक जप्त करुन 46 हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

महापालिकेमार्फत सिंगल यूज प्लास्टिकच्या वापराविरोधात सातत्याने कारवाई करण्यात येत असून सदरची मोहिम यापुढेही सुरू राहणार असल्याचे प्रदुषण नियंत्रण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande