
लातूर, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
निलंगा तालुक्यातील जिल्हा बँकेच्या विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्या, मजूर संस्था, पतसंस्था, मत्स्य संस्था आदींच्या मतदारांशी माजी आमदार धिरज विलासराव देशमुख यांनी संवाद साधला.
लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने गेल्या पाच वर्षांत पारदर्शक कारभारातून शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली आहे. बँकेचा कारभार नफ्यात ठेवत शेतकरी सभासदांच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे.
आगामी काळातही शेतकरी केंद्रबिंदू मानून बँकेच्या माध्यमातून अधिक प्रभावीपणे काम करण्याचा आमचा निर्धार आहे. माजी मंत्री तथा सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शेतकरी हिताची जाण असणाऱ्या उमेदवारांना आगामी जिल्हा बँक निवडणुकीत संधी देण्यात येईल असे प्रतिपादन धिरज विलासराव देशमुख यांनी केले
‘
.
.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis