
बीड, 12 सप्टेंबर (हिं.स.)।
परळी येथील वैद्यनाथ मंदिराजवळील श्री संत गुरुलिंग स्वामी मंदिर (बेलवाडी) येथे कर्नाटकातील निंबर्गा येथील श्री ष. ब्र. १०८ नीलकंठ शिवाचार्य महाराज गदगेश्वर हिरेमठ यांच्या ३१ दिवसीय २५व्या श्रावणमास मौन अनुष्ठानाची सांगता आज शनिवार, दि. १२ सप्टेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी झाली. दि. १३ ऑगस्टपासून सुरू असलेल्या या अनुष्ठानामुळे बेलवाडी परिसरात महिनाभर भक्तिमय व आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले होते. कलबुर्गी जिल्ह्यातील आळंद तालुक्यातील निंबर्गा येथील नीलकंठ शिवाचार्य महाराज यांच्या मौन अनुष्ठानाचा हा २५वा वर्ष आहे. शनिवारी सकाळी ८.३० वाजता पाद्यपूजा व मौन समाप्ती होईल. त्यानंतर इष्टलिंग पूजा, विविध धार्मिक विधी तसेच शिवाचार्य महाराजांचे आशीर्वचन झाले. या सांगता सोहळ्यास विविध मान्यवर उपस्थित होते. परळी शहर व तालुक्यातील वीरशैव लिंगायत समाजबांधवांनी कुटुंबासह मोठ्या संख्येने उपस्थित राहून शिवाचार्य महाराजांचे दर्शन व आशीर्वचन घेतले. परळीच्या नगराध्यक्षा सौ.पद्मश्रीताई बाजीराव धर्माधिकारी यांनीही या धार्मिक सोहळ्याला उपस्थित राहून परमपूज्य स्वामीजींचे आशीर्वाद घेतले. तसेच समाज बांधवांच्या या अध्यात्मिक सोहळ्यात सहभाग नोंदवत उत्साह वाढवला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis