देवरूखच्या चौसोपी वाड्यात ३७५व्या वर्षी गणपतीचे आगमन
रत्नागिरी, 12 सप्टेंबर (हिं.स.) । देवरूखच्या वरच्या आळीतील जोशी चौसोपी वाड्यातील सिद्धिविनायक मंदिरात आज जसलग ३७५व्या वर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला गणेशमूर्तीचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले. देवरूखच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला ३७५ वर्षांची ऐत
देवरूखच्या चौसोपी वाड्यात गणपतीचे आगमन


रत्नागिरी, 12 सप्टेंबर (हिं.स.) । देवरूखच्या वरच्या आळीतील जोशी चौसोपी वाड्यातील सिद्धिविनायक मंदिरात आज जसलग ३७५व्या वर्षी भाद्रपद शुद्ध प्रतिपदेला गणेशमूर्तीचे भक्तिमय वातावरणात आगमन झाले.

देवरूखच्या चौसोपी वाड्यातील गणेशोत्सवाला ३७५ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभली आहे. या पारंपरिक गणपतीचे आज भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात आगमन झाले. पिढ्यान्पिढ्यांची ही परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने आणि उत्साहाने सुरू आहे. गणरायाच्या आगमनानिमित्त परिसरातील नागरिक, भाविक तसेच जोशी कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने गणेशमूर्तीचे स्वागत करण्यात आले.

विशेष म्हणजे, या गणपतीच्या आगमनाला केवळ धार्मिक महत्त्व नसून देवरूखच्या सांस्कृतिक आणि सामाजिक परंपरेतही त्याचे विशेष स्थान आहे. काळ बदलला, अनेक गोष्टी बदलल्या; मात्र शेकडो वर्षांची परंपरा आजही श्रद्धेने जपली जात आहे.

गणरायाच्या आगमनावेळी “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया”च्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. फुलांची आकर्षक सजावट, पारंपरिक वेशभूषा आणि भक्तिमय वातावरणामुळे चौसोपी परिसरात गणेशोत्सवाचा उत्साह अनुभवायला मिळाला.

देवरूखच्या या जोशी चौसोपी वाड्यातील सिद्धिविनायक मंदिरातील अश्वारूढ गणेशमूर्तीचे सवाद्य मिरवणुकीने आगमन झाले. मोरगावच्या उत्सवाप्रमाणे हा गणेशोत्सव साजरा होतो. गणेशचतुर्थीऐवजी भाद्रपद प्रतिपदा ते पंचमी या काळात हा उत्सव साजरा केला जातो.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande