परभणी - झरी येथील गोपालकाने भरविले गोमय गणेशमूर्तींचे प्रदर्शन
परभणी, 13 सप्टेंबर (हिं.स.)। झरी येथील गोपालक पद्माकर चव्हाण यांनी हाॅटेल नीरज येथे दिनांक ११ सप्टेंबरपासून गोमय गणेश मूर्तींचे प्रदर्शन मांडले आहे. हे प्रदर्शन १४ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.चव्हाण कुटूंबीयांनी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या सुब
अ


परभणी, 13 सप्टेंबर (हिं.स.)।

झरी येथील गोपालक पद्माकर चव्हाण यांनी हाॅटेल नीरज येथे दिनांक ११ सप्टेंबरपासून गोमय गणेश मूर्तींचे प्रदर्शन मांडले आहे. हे प्रदर्शन १४ सप्टेंबरपर्यंत असणार आहे.चव्हाण कुटूंबीयांनी गाईच्या शेणापासून तयार केलेल्या सुबक मुर्ती या ठिकाणी आहेत.

अनंत गोपाळ गोशाळा संचालक पद्माकर अनंतराव चव्हाण हे मागील सात वर्षांपासून देशी गायीच्या शेणापासून (गोमय) गणेशमूर्ती तयार करतात. यावर्षी जून ते ऑगस्टदरम्यानच्या तीन महिन्यांच्या कालावधीत पद्माकर चव्हाण, त्यांच्या पत्नी वैशाली, मुले उत्कर्षा व वेदान्त यांनी ६० गणेशमूर्ती घरच्या घरी तयार केल्या आहेत. या कामी त्यांना काष्टशिल्पकार शिल्पकार नामदेवराव पंडित यांचे सहकार्य आहे. तीन, सहा इंचांपासून ते १४ इंचांपर्यंतच्या मूर्ती त्यांनी बनविल्या आहेत. विशेष म्हणजे यावर्षीच्या प्रदर्शनात १४ फूट उंचीची मूर्ती सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. शेणात लाकडाची पावडर मिसळून या मूर्ती बनवल्या जातात परभणीसह गोवा, नागपूर, पुणे, मुंबई, नांदेड, छत्रपती संभाजीनगर आदी ठिकाणी त्यांच्या मुर्ती विक्रीला गेल्या आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande