
लातूर, 13 सप्टेंबर (हिं.स.)।
प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी कम्युनिकेशन स्कीलचा अभ्यास आता होणार अधिक सोपा!
प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘सक्सेस गाईड कम्युनिकेशन स्कील’ या इंग्रजी पुस्तकाचे प्रकाशन रविवार, १३ सप्टेंबर २०२६ रोजी आमदार अमित विलासराव देशमुख यांच्या हस्ते बाभळगाव निवासस्थानी करण्यात आले. विलासराव देशमुख फाउंडेशन ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, लातूर येथील इंग्रजी विषयाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. शाहिद दरुगे यांनी हे पुस्तक लिहिले आहे.
एमएसबीटीके स्कीम अभ्यासक्रमानुसार विद्यार्थ्यांना कम्युनिकेशन स्कील विषयाची तयारी सुलभ व्हावी, हा या पुस्तकामागील प्रमुख उद्देश आहे. या पुस्तकात व्यावहारिक इंग्रजी, संवादकौशल्य, व्याकरण, शब्दसंग्रह, लेखनकौशल्य तसेच परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण सरावाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासासोबतच परीक्षेच्या तयारीसाठी हे पुस्तक मार्गदर्शक ठरणार आहे.
यावेळी संस्थेचे प्राचार्य प्रा. राजकुमार साखरे, कार्यालयीन अधीक्षक लक्ष्मण देशमुख, ग्रंथपाल जगदाळे सर, शिवा शिंदे, प्रयोगशाळा सहाय्यक आरिफ शेख, सामाजिक कार्यकर्ते नागेश जोगदंड तसेच एमएनएसचे समुपदेशक दत्ता सोमवंशी यांची उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis